डॉ. लीला पाटील - लेख सूची

एड्सची जाणीव शालेय वयात

हल्ली कौमार्यावस्था ही पूर्वीपेक्षा कमी वयात मुलामुलींना प्राप्त होत आहे. प्रसारमाध्यमांशी जवळीक व अवती-भवतीच्या घटनांचे आकलन हे शालेय वयातील वैशिष्ट्य होय. एड्सबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत आहे. परंतु योग्य पद्धत व संदेशाविना त्याविषयीची माहिती मिळतेच असे नाही. एड्सच्या टी.व्ही.वरील प्रबोधनपर जाहिराती व माहितीचे कार्यक्रम हे तज्ज्ञमंडळीच्या सल्ल्याने व सहाय्याने आयोजित करण्यात येतात परंतु ते लागले की …

स्वयंसेवी संघटना —- आत्मपरीक्षण हवे

स्वयंसेवी संस्थांचे व संघटनांचे विकासकार्यातील महत्त्व नाकारता येत नाही. उलट जागतिकीकरणाच्या काळात तर त्यांच्या योगदानाची आवश्यकता फार आहे. सरकार आता निर्हस्तक्षेप नीतीला बांधील आहे. शासन व प्रशासन सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासाच्या कामगिरीत निष्प्रभ ठरत आहे. खाजगीकरणाचे धोरणही कार्यवाहीत येत आहे. अशा उदार, निबंधरहित आणि शासन-मध्यस्थीस गौण स्थान देण्याच्या पद्धतीमुळे स्वयंसेवी संस्था-संघटनांचा कार्यभाग व भूमिका महत्त्वाची …

महिला आरक्षणाने राज्यकारभारात सहभाग पण . . .?

७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थांची ताकद वाढविणारी आहे. लोकांचे सामर्थ्य व एकजूट वाढविणारी आहे. या कल्पनेचे वास्तवात रूपांतर करण्यात मात्र प्रचंड कोंडी होत आहे. ही व्यवस्था बदलायला ही घटना-दुरुस्ती उपकारक ठरू शकते. त्यामुळे प्रस्थापित वर्गाला हादरे बसू शकतात. मात्र त्यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. सर्व राज्यांच्या मर्जीवर सोडलेल्या घटनादुरुस्तीकडून अधिक …

स्त्री-सुधारणेच्या वारशाचे–विस्मरण झालेला महाराष्ट्र

देशातील सर्वांत प्रगत आणि कायदा व सुव्यवस्थेबाबतीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात गेल्या सहस्रकाच्या अखेरच्या वर्षात राज्यातील स्त्रियांची अवस्था फार शोचनीय असल्याचे आढळते. मुंबई महानगराला मागे टाकून नागपूर व अमरावती जिल्हे स्त्रियांवरील अत्याचारांबाबतीत पुढे आहेत. पुणे, नांदेड, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातही या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सी. आय. डी.) नुकतीच ही आकडे-वारी उपलब्ध …